🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रात एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ नयेत, पण काय करणार? मला न्याय हवा असेल तर मी न्यायालयात जाणार नाही, तेथे न्याय मिळत नाही, असे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीशांचीच ही अवस्था तर सामान्यांचे काय? विक्रांत युद्धनौकेच्या नावावर पैसे गोळा करून अपहार करणे हा देशद्रोह नाही काय? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केला आहे.
‘विक्रांत वाचवा’च्या नावाखाली कोटय़वधी रुपये गोळा करून अपहार करणाऱ्या संशयित गुन्हेगारांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. बँकेत ,पतपेढ्यांत, सार्वजनिक उत्सव मंडळात शे-पाचशे रुपयांचा हिशेब लागत नाही म्हणून फसवणुकीच्या गुन्ह्याखाली न्यायालयाने सामान्य लोकांना जेलात पाठवले आहे. मात्र चोराला पकडले म्हणून न्यायालयाने पोलिसांनाच दटावले आहे.
पत्रा चाळ, गोवावाला कंपाउंड प्रकरणे 2013 आधीची आहेत. ती उकरून महाविकास आघाडीच्या लोकांवर खटले भरले गेले त्यांना तुरुंगात पाठवले गेले.दुसऱ्या बाजूला मुंबै बँकेपासून विक्रांत निधी घोटाळय़ात ठोस पुरावे असताना न्यायालय जामीन देत आहे. महाराष्ट्रात एका राजकीय पक्षाच्या लोकांनी तपास यंत्रणांचा ताबा घेतलाच आहे. न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे देऊ नयेत, काय करणार? अशी खंतही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…हा देशद्रोह नाही का?”, माय लॉर्ड, तुम्हीच सांगा; संजय राऊतांचा सवाल
“लोकांच्या समस्या राजसाहेबांनीच सोडवायच्या, तुम्ही फक्त प्रॉपर्टी…”, ‘मनसे’चा शिवसेनेला टोला
IPL 2022 RR vs GT : हार्दिकसेना पहिल्या क्रमांकावर विराजमान; बलाढ्य राजस्थानला चारली धूळ!
अखंड भारत झालाच पाहिजे, नवनीत राणांनी केले मोहन भागवतांचे समर्थन!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
