Share

अखंड भारत झालाच पाहिजे, नवनीत राणांनी केले मोहन भागवतांचे समर्थन!

Published On: 

अमरावती : “मोहन भागवत ही व्यक्ती खूप अभ्यासू असून देशासाठी खूप वर्ष काम करत आहे. आम्ही त्यांच्या विचारांचे समर्थन करतो. भागवतांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत,” असे मत खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केले. पत्रकारांनी राणा यांना मोहन भागवतांनी नुकत्याच केलेल्या अखंड भारत या विधानाच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारले असता, ‘भागवतांच्या विचारांचे आम्ही समर्थन करतो’ असे राणा म्हणाले.

“पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहायला मिळेल.” असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. हिंदू धर्म हाच सनातन धर्म आहे असेही मोहन भागवत म्हणाले होते.

“भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. अगदी त्याचप्रकारे संत आणि महंत यांच्या आशीर्वादाने लवकरच अखंड भारताची निर्मिती होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जर आपण सगळ्यांनी प्रयत्न केले तर १० ते १५ वर्षातच अखंड भारताची निर्मिती होईल. अखंड भारत हा अजेंडा कायमच महत्त्वाचा आहे. स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांच्या स्वप्नातला अखंड भारत १० ते १५ वर्षात होईल. यामध्ये कुणीही अडथळे आणू शकत नाही. जो या मार्गात येईल तो संपेल,” असे मोहन भागवत यांनी विधान केले होते.

यावर संजय राऊत यांनी भागवत यांच्यावर टीका केल होती. “अंखड भारताचे स्वप्न कुणाचे असेल तर आम्ही त्याचे आम्ही स्वागतच करतो. त्याला देशातील कुठलाही पक्ष विरोध करणार नाही, यापूर्वी भाजपने या मुद्द्यांवर मते मागितली. आधी पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घ्या, मग पाकिस्तान ताब्यात घ्या, अफगाणीस्तान घ्या, मग एक अखंड भारत निर्माण करा. जो भाग यापूर्वी हिंदुस्थानचा होता, तो भाग घ्या. त्याआधी स्वांतत्रवीर सावरकरांना भारतरत्न द्या, सावरकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अंखड हिंदुस्थान ही संकल्पना राबवली, रुजवली त्यांचे आभार माना. काश्मिरी पंडीतांना पुन्हा परत आणा,” असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान भागवतांच्या याच विधानावर नवनीत राणा म्हणाले की, “मोहन भागवत अनेक दिवसापासून लोकांसाठी काम करत आहेत. आपल्या भारत देशासाठी काम करत आहेत. आम्ही त्यांच्या विचारांचे समर्थन करतो.”

ज्या दिवशी अखंड भारताचे स्वप्न पूर्ण होईल, त्यादिवशी आम्ही जोरदारपणे जल्लोष करू असा विश्वास ही नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!