Share

IPL 2022 RR vs GT : हार्दिक पंड्या इज बॅक..! कप्तानाच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातचं राजस्थानला १९३ धावांचं आव्हान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात राजस्थानचा कप्तान संजू सॅमसनने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कप्तान हार्दिक पंड्याच्या दमदार धावांच्या जोरावर गुजरातने राजस्थानला १९३ धावांचे आव्हान दिले आहे.

गुजरातचा डाव

मॅथ्यू वेड आणि शुबमन गिल यांनी गुजरातसाठी सलामी दिली. वेड (१२) धावबाद होऊन तंबूत परतला, तर रियान परागने शुबमनला (१३) झेलबाद केले. त्यानंतर आलेला विजय शंकर (२) कुलदीप सेनचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान हार्दिक पंड्या आणि अभिनव मनोहर यांनी संघासाठी अर्धशतकी भागीदारी केली. हार्दिकने १४व्या षटकात अर्धशतक पूर्ण केले. अभिनवने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावांचे योगदान दिले. युझवेंद्र चहलने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरने हार्दिकसोबत जलद धावा केल्या. २० षटकात गुजरातने ४ बाद १९२ धावा केल्या, मिलरने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या. तर कप्तान पंड्याने ८ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८७ धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!