🕒 1 min read
मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला ‘वीरप्पन गँग’ म्हणून डिवचले आहे. “महागाई वर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, कोरोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता तेंव्हा लोकांच्या समस्या पण राजसाहेबांनीच सोडवायच्या, आणि तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार आणि टेंडर मधलं कमिशन खाणार?”, असा टोला त्यांनी ट्वीट करत लगावला आहे.
यापूर्वीही संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा ‘वीरप्पन गँग’ म्हणून उल्लेख केला आहे. पाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मनसे म्हणजे भाजपची सी टीम असल्याचा उल्लेख केला होता. त्यावरच संदीप देशपांडे यांनी ‘वीरप्पन गँग’ म्हणत प्रत्युत्तर दिले होते.
‘मला वाटते की शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे.ज्या पद्धतीने ही विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रीय आहे, त्यांना आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. त्यानुसार कुठे कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब त्यांनी ईडीला द्यावा. आमच्याबद्दल बोलण्याची काहीच गरज नाही’, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 RR vs GT : हार्दिकसेना पहिल्या क्रमांकावर विराजमान; बलाढ्य राजस्थानला चारली धूळ!
- IPL 2022 RR vs GT : हार्दिक पंड्या इज बॅक..! कप्तानाच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातचं राजस्थानला १९३ धावांचं आव्हान
- अखंड भारत झालाच पाहिजे, नवनीत राणांनी केले मोहन भागवतांचे समर्थन!
- PHOTOS :आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे फोटो समोर; चाहत्यांती उत्सुकता संपली
- मद्यविक्रीतून ठाकरे सरकार मालामाल, रेकॉर्डब्रेक उत्पन्न!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
