मुंबई – केंद्र सरकारने नवं मंत्रालय तयार केलं आहे. केंद्राला सहकाराला काही मदत करायची इच्छा असेल. सहकार हा राज्याचा विषय आहे. अमित शहांकडे नव्या खात्याची जबाबदारी गेल्याने घाबरण्याचं कारण नाही. त्यातून काही चांगलं होऊ शकतं. शहांना सहकाराचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या मनात काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या अंमलात आणतील, असं खा. संजय राऊत म्हणाले आहेत.
अमित शहा हे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांना क्षेत्रात काही चांगलं काम करावसं वाटत असेल, त्यामुळे ते खातं त्यांनी त्यांच्याकडे घेतलं असेल. ते सहकार क्षेत्रासाठी चांगले आणि सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्ही आशा करतो, असा चिमटाही त्यांनी काढला.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सहकारावर भाष्य केलं आहे. सहकार हा राज्याचा विषय आहे. राज्याच्या कायद्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही हे पवारांनी सांगितलं आहे. पवारां एवढा सहकारावर अधिकारवाणीने बोलणारा नेता आणि तज्ज्ञ नाही, असं सांगतानाच महाराष्ट्रात सहकार चांगला आहे. कुणाला महाराष्ट्राचं हे चांगुलपण पाहावंसं वाटत नसेल तर मग पाहू, असा इशाराही त्यांनी दिला.
ग्रामविकास व सहकार ही तळागाळाशी जोडलेली खाती आहेत व त्या माध्यमातून लोकांना मदत करता येते हे महाराष्ट्र व गुजरातमध्ये दिसले आहे. गृहखाते हा ‘थँकलेस जॉब’ आहे. त्यामुळेच सहकार क्षेत्रातून लोकांपर्यंत पोहोचावे, असा विचार गृहमंत्र्यांनी केला असेल तर कोणाला चलबिचल होण्याची आवश्यकता नाही. गुजरातमधील अनेक सहकारी बँका, सहकारी संस्थांशी अमित शहा यांचा संबंध आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राचा विकास तसेच वाढ याबाबत शहा यांनी काही नवे करायचे ठरविले असेल तर त्यांचे स्वागतच करायला हवे असे राऊत यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ तीन युवा खेळाडूंवर प्रभावित सुरेश रैना म्हणाला…
- ‘शाळा अद्याप सुरू करू नयेत, कारण…’ ; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची भूमिका
- महाराष्ट्रात आज कोरोनाचे ८ हजार ५३५ नवे रुग्ण तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त
- ‘नागरिकांनी ‘या’ अफवांवर विश्वास ठेवू नये’, मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
- ‘…तर खांद्याला खांदा लावून काम करु’; नितेश राणेंच्या भाषणानंतर शिवसेना नेत्याने थोपटली पाठ


