Share

संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच; मनसेचं खुलं आव्हान !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेनं भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीला येत्या निवडणुकांमध्ये शह देण्यासाठी आता भाजप आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. अशातच आज सकाळीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची मुंबईत ‘कृष्णकुंज’वर भेट झाली. यामुळे येत्या काळात भाजप-मनसेची जवळीक वाढून युती होण्याची शक्यता वाढली आहे.

दरम्यान, या भेटीवर शिवसेना नेते आणि  खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘कोणी कोणाला भेटण्यावर बंधन नाही. मनसे आणि भाजपने एकदा ताकद आजमावून दाखवावीच. प्रत्येकाला भेटण्याचा अधिकार आहे. लोकशाही राहिली पाहिजे असे वाटते,’ असं राऊत म्हणाले होते.

राऊत यांच्या या विधानाचा आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी चांगलाच समाचार घेतला असून राऊत यांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीत असं खुलं आव्हान दिलं आहे. ‘संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच,’ असं नांदगावकर यांनी आव्हान दिलं आहे. दरम्यान, मनसे-भाजप युतीवर देखील त्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.

‘चंद्रकांत पाटील जेव्हा आले आणि गेले तेव्हा आनंदात होते. सगळ सकारात्मक होते. राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याचा दौरा केला आहे. मुंबईतही पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामे सुरू आहेत. मात्र, दोन पक्ष भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल,’ असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!