Share

आता ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा ९ ऑगस्ट ऐवजी होणार ‘या’ तारखेला !

Published On: 

मुंबई : २०२० पासून कोरोना रोगाने राज्यासह देशात थैमान घातले आहे. या रोगाचा सर्व क्षेत्रांना बसला असून देशाची आर्थिक स्थिती देखील बिकट झाली आहे. तर शिक्षण क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, १० वी आणि १२ वीच्या बोर्डाचे निकाल जाहीर झाले आहेत. आता, ५ वी आणि ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ही ९ ऑगस्ट २०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.

परंतु राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भूस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा ९ ऑगस्ट २०२१ ऐवजी १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येईल. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र १२ ऑगस्ट २०२१ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. वरील झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!