मुंबई – राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र, गेले काही दिवस राज्याच्या राजकारणात काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कारण शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी गेल्या तीन दिवसात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं पडद्यामागे काय शिजतंय? याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर ते सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. त्यावेळी तेथे असणाऱ्या पत्रकारांनी राऊत यांना या भेटीचे कारण विचारले त्यावेळी राऊत म्हणाले, शरद पवारांना सहज भेटलो. त्यात कोणताही खास विषय नव्हता असं म्हणत त्यांनी वेळ मारून नेली.
दरम्यान, संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोनवेळा भेट घेतली. संजय राऊत हे दोन दिवसात सातत्याने महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी भेटत आहेत. तीन दिवसापूर्वी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर दोन तास चर्चा झाली होती. त्यानंतर आज दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर लगेचच संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले.
दरम्यान, या गाठीभेटी आणि चर्चा नेमक्या कशाबाबत सुरु आहेत याविषयी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. अचानक राजकीय भेटीगाठी वाढल्याने राजकीय पटलावर नेमकं काय घडतं याचा अंदाज आता वेगवेगळ्या पद्धतीने वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय, याचे आडाखे राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- आमचे देशमुख तर तुमचे दरेकर; भाजप नेत्यांच्या मागेही लागणार चौकशीचा ससेमिरा ?
- कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी हीच कॉंग्रेसमधील युवा कार्यकर्त्यांची इच्छा ?
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- मंत्री पदाबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या विजय वडेट्टीवारांचं ‘ते’ दुखणं तसं जुनेच आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
