Share

‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचे आयोजन केले होते. लोणावळ्यात 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठक पार पडली आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी शिबिरात भाषण करताना जाहीरपणे आपल्या मनातील सल बोलून दाखवली आहे. आपण ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नसल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला असून हा काँग्रेससह महाविकास आघाडीला घरचा आहेर असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्रीपद, महसूल, अर्थ या खात्यांना महत्व दिलं जातं. मात्र, वडेट्टीवार यांना या पैकी खात मिळालं नसल्याने त्यांनी खंत आज बोलून दाखवली.

यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य करत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलंय. ‘स्वबळाची भाषा करणाऱ्या पक्षांतर्गत किती खदखद आहे याचं मूर्तिमंत उदाहरण विजय वडेट्टीवारांच्या विधानातून समोर आलंय. काँग्रेसने सातत्याने ओबीसींवर अन्याय केलाय,’ असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलाय.

पुढे ते म्हणाले, ‘वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. राज्यात सत्ता स्थापन करताना विरोधी पक्षनेता हा पुढचा मुख्यमंत्री असतो. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं. हे उचित होतं. त्यांच्या मनातील खदखद आज व्यक्त केली आणि महाविकास आघाडी मध्ये आलबेल आहे असं म्हणणाऱ्यांसाठी वडेट्टीवारांचं वक्तव्य हे चपराक आहे. छगन भुजबळ हे देखील राष्ट्रवादीतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत, मात्र त्यांना २२ व्य क्रमांकाचं खातं दिलंय. त्यामुळे आघाडी सरकार ओबीसींना डावलण्याचं आणि अवमानित करण्याचं काम करतंय.’

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!