लोणावळा : ओबीसींना आरक्षण मिळावं, आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबतचं चिंतन करण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचे आयोजन केले आहे. लोणावळ्यात 26 आणि 27 जून रोजी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
या शिबिरात भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, महाविकास आघाडीचे मंत्री सुनील केदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या शिबिराला हजेरील लावली. यात काही राजकीय ठराव मांडण्यात आले. दरम्यान, इम्पिरिअल डाटा मिळवण्यासाठी राज्य सरकार उद्याच सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी या शिबिरात दिली आहे.
दरम्यान, या शिबिरात भाषण करताना विजय वडेट्टीवार यांनी चांगलीच राजकीय बॅटिंग केली. ‘मी अशा भागात राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असं वडेट्टीवार म्हणाले. यावर मंचावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं सांगितलं. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी, ‘आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे.’ असं भाष्य करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
महत्वाच्या बातम्या
- ‘गोपीचंद पडळकर हे बांडगुळ आहेत आणि अशी बांडगुळं वाढतायत’; शिवसेना आमदाराचा पलटवार
- ‘प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय अंतिम टप्प्यात ; लवकरच भरणार ३ हजार पदांच्या जागा’
- ‘ओबीसींना आरक्षण दिल्याशिवाय पुढच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत’; पंकजा मुंडे कडाडल्या
- शरद पवारांसह मंत्र्यांच्या गाड्या थेट ५ कोटींच्या सिंथेटिक ट्रॅकवर; भाजपने केली टीका
- ‘ओबीसी असल्यानंच महसूल खातं मिळालं नाही’; वडेट्टीवारांनी जाहीरपणे बोलून दाखवली खंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
