मुंबई – राज्यात सध्या ऐन पावसाळ्यात राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजपकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अडचणीत आणले जात असल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला आता मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँक घोटाळ्याचा तपास पुन्हा एकदा सुरु झाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने हा तपास सुरु केला आहे. यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुंबै बँकेत १२३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप आहेत. मुंबै बँकेचे अध्यक्ष व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह इतरांवर याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा पुनर्तपास सुरु झाल्याने दरेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, या दोन्ही प्रकरणांचा तपास झाला पाहिजे तसेच सत्य जे असेल ते देखील जनतेच्या समोर यायला पाहिजे अशीच सर्वसामन्यांची भावना आहे मात्र तपास यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी तर उपयोग करून घेतला जात नाही ना असा देखील सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर देशमुखांचा बचाव करताना महाविकास आघाडीतील नेते हे भाजपला टार्गेट करत होते. राज्यामध्ये मागच्या काळात अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल नोंदवले गेले होते. त्यांनी गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. त्या आरोपपत्राचा वापर करून किंवा बाहेरुन आरोप करुन अनिल देशमुखांना अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्रीय एजन्सीकडून सुरू असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता.
दुसऱ्या बाजूला खा. संजय राऊत यांनी देखील भाजपला इशारा देताना एक महत्वाचे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रातील तपास यंत्रणा खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात हे साऱ्यांना माहिती आहे. राज्यातील नेते, मंत्र्यांवर काही आरोप असतील तर राज्यातील तपास यंत्रणा चौकशी करण्यास सक्षम आहे हे आम्ही वारंवार सांगत आलोय. पण शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मुद्दाम ठरवून त्रास दिला जात आहे. आम्ही पण बघून घेऊ, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपला इशारा दिला होता. दरम्यान, राऊत यांनी केलेलं वक्तव्य आणि आता होत असलेल्या या घडामोडीचे टायमिंग यामुळे आमचे देशमुख तर तुमचे दरेकर हे दाखवून देत कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘विजय वडेट्टीवार यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं खातं द्यायला हवं होतं, मात्र…’
- पुण्यात उद्यापासून नियम आणखी कडक; जाणून घ्या आज किती रुग्ण संख्या
- औरंगाबादकरांसाठी आनंदाची बातमी; कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट
- ‘तो वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो’; विजय वडेट्टीवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- मंत्री पदाबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या विजय वडेट्टीवारांचं ‘ते’ दुखणं तसं जुनेच आहे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
