Share

कॉंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी हीच कॉंग्रेसमधील युवा कार्यकर्त्यांची इच्छा ?

Published On: 

🕒 1 min read

 पुणे –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह आगामी सर्वच निवडणुका स्वबळावर लढवण्याचा नारा देऊन राज्यात खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत जाताच नरमाईची भूमिका घेतली. राज्यातील जिल्हा परिषदांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक परिस्थिती आणि गरज पाहून लढवण्यात येतील, अशी भूमिका त्यांनी शुक्रवारी मांडली. नाना पटोले हेच यासाठी आग्रही होते मात्र नुकत्याच झालेल्या दिल्लीवारी नंतर त्यांनी आपली तलवार म्यान केल्याचे दिसून येत आहे.

राजकीय पक्ष हे वाढवावेत हे  त्या-त्या पक्षाच्या नेतृत्त्वाचा, देशाच्या लोकशाही प्रक्रियेतील हा अधिकार आहे. साधारणपणे 1999 पासून 2014 पर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं. त्या काळात या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या जायच्या. जिल्हा परिषद असो किंवा महापालिकेची निवडणूक असो यामध्ये स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेवून त्यानंतर मग निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यात यापूर्वी देखील आलेला आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा  देण्यात गैर  काय असा सवाल उपस्थित होत आहे.

नाना पटोले यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा केला होता. यावेळी त्यांना कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय सुरु आहे याचा अंदाज आला. यात कॉंग्रेसच्या तरुण नेतृत्त्वामध्ये प्रामुख्याने स्वबळावर निवडणुका लढण्याचा स्वर आहे असे समोर आले. युवा कार्यकर्त्यांची हीच भावना लक्षात घेवून पटोले यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता. पटोले यांना यावेळी खंबीर साथ भाई जगताप यांनी दिली होती. स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेचे युवा कार्यकर्ते आणि नेत्यांनी स्वागत देखील केले होते.

दरम्यान, पटोले यांनी आपली भूमिका मांडण्यापूर्वीच काँग्रेस प्रदेश प्रभारी एच के पाटील यांनी स्वबळावर भाष्य केले होते. ‘आत्ता कोणत्याही निवडणूका नाहीत, विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीवेळी ते पाहता येईल. तसेच जो काही निर्णय असेल तो पक्षश्रेष्ठी घेतील.’ असे वक्तव्य एच के पाटील यांनी केले. त्यामुळे पटोले यांच्या स्वबळाच्या भूमिकेची हवा निघुन गेली होती असं म्हटले तरी काही चुकीचे ठरणार नाही.

नाना पटोले यांनी निवडणुकांवर डोळा ठेवून स्वबळाचा नारा  दिला असे देखील म्हणता येणार नाही. कारण निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी असतानाच त्यांनी ही भूमिका मांडली होती. नानांनी दिलेला स्वबळाचा नारा सामान्य कार्यकर्त्याना देखील आवडला होता. नानांचा तो संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहचला असून, ते कामाला देखील लागले होते. मात्र आता नानांनी बदललेल्या भूमिकेमुळे आपल्या उत्साहाला मुरड घालावी लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!