मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रीय पातळीवर राजकीय खेळी करण्याचे प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत आहे. या खेळीसाठी ते निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची मदत घेत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडी, प्रशांत किशोर यांची वारंवार भेट आणि प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन विरोधकांची नवी मोट बांधण्याची तयारी यामुळे शरद पवार चांगलेच चर्चेत आले आहेत.
शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पुन्हा कमालीचे सक्रिय झाले आहेत. यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात असून काही वेळापूर्वीच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची भेट झाली आहे. महाविकास आघाडीच्या बांधणीत या दोन्ही नेत्यांची महत्वाची भूमिका आहे. या दोन्ही नेत्यांची भेट ही कायमच चर्चेत असते. आज पवारांची भेट घेतल्याचे खुद्द संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे सांगितलं आहे.
मा.श्री.शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा
झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही.
उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे श्री.पवार म्हणाले. @PawarSpeaks @OfficeofUT— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2021
‘शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही. उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे पवार म्हणाले,’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नानांनी हाती घेतलं ‘धनुष्यबाण’; काँग्रेसने ट्विट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
- पुणेकरांनो काळजी घ्या…आज कोरोनामुक्तांपेक्षा नव्या रुग्णांची संख्या अधिक !
- ‘येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा’; अजितदादांचा कार्यकर्त्यांना आदेश
- इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून
- बॉलिवूडमधील नामांकित फॅशन डिझायनर्सवर EDकडून कारवाई होण्याची शक्यता


