मुंबई : कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृषी बाजार उत्पन्न समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
स्वगृही परतलेल्या प्रसेनजीत पाटील यांच्या येण्याने बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून एक जागा भक्कम झाल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही यावेळी केले.
प्रसेनजीत पाटील यांच्या प्रवेशाने विदर्भात पक्षाला अधिक बळकटी मिळणार आहे. प्रतिकूल परिस्थिती बदलते, आपण जिद्द सोडायची नसते, आगामी सर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकला पाहीजे अशा जोमाने सर्वांनी कामाला सुरुवात करा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी उपस्थितांना केले.
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, वरिष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतलेला इकबाल कासकर कोण आहे
- ‘कृषी जैवतंत्रज्ञान काॅलेजला विलासराव देशमुखांचे नाव द्या’, आ.सतीश चव्हाणांची ठाकरे सरकारकडे मागणी
- ‘विधानसभा अध्यक्षांची निवडणूक टाळून संवैधानिक व्यवस्था कोलमडली, राष्ट्रपतींना अहवाल पाठवा’
- अजब ! तुकाराम मुंढेंनी ठोठावलेला दंड पुणे महापालिका करणार परत
- राष्ट्रवादीचा काँग्रेसला दे धक्का ! बड्या नेत्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
