🕒 1 min read
जळगाव : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या आक्रमक झाले आहेत. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्य पातळीपर्यंत स्वबळावर काँग्रेसची सत्ता यावी यासाठी त्यांनी विविध दौरे, आंदोलने, कार्यकर्ता मेळावे यांचं आयोजन केल्याचं दिसून येतंय. सध्या काँग्रेसच्या स्वबळावर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नाराज आहेत.
तर स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी स्वबळाची तयारी करण्यात गैर नसल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत. सध्या पटोले उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यात आहेत. विविध ठिकाणी त्यांचे खास स्वागत करण्यात येत आहे. यावेळी आदिवासी समाजाने त्यांचे केलेल्या स्वागताचे फोटो काँग्रेसने ट्विट केले आहेत. यातील एक खास फोटो म्हणजे नानांनी हातात धनुष्यबाण घेतल्याचं दिसून येतंय. यावर काँग्रेसने कॅप्शन सुचविण्यास सांगितले आणि नेटकऱ्यांनी भन्नाट उत्तरे दिली आहेत.
धनुष्यातून सुटलेला तीर, आणि नानांचा शब्द वापस येत नाही
— नरेश कनाके???????? (@nareshkanake16) June 23, 2021
दरम्यान, स्वबळाचा संदेश आम्ही कार्यकर्त्यांना दिला आहे. तो संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला असून, ते कामाला लागले आहेत. त्यामुळं आता माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’ त्यामुळे नाना पटोले हे काँग्रेसच्या स्वबळावर ठाम असल्याचं पुन्हा समोर आलं आहे.
धनुष्यातून बाण सुटला..,
स्वबळाचा नारा नानांनी दिला…@NANA_PATOLE #NanaPatole#Congress— Harshal Jadhav (@harshal_rj) June 23, 2021
‘निवडणुकांवर डोळा ठेवून आम्ही स्वबळाचा नारा दिलेला नाही. निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी असतानाच आम्ही भूमिका मांडली आहे. त्यावर ठाम आहोत. काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी केंद्र सरकारच्या विरोधात दोन हात करेल,’ असं देखील देखील पटोले म्हणाले आहेत.
सेनेशिवाय पर्याय नाही ????
— Shridhar (@SHRIDHARVKAMBLE) June 23, 2021
यासोबतच, नाना पटोले यांनी कोरोनाची देशातील स्थिती, इंधन दरवाढ, देशाची आर्थिक स्थिती आदी मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर देखील हल्लाबोल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सावधान ! ‘डेल्टा प्लस’चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
- ‘शिवसेनेची विचारसरणी सहन करू शकतो, पण..’ पृथ्वीराज चव्हाणांची ‘लेटरबॉम्ब’वर प्रतिक्रिया
- जितेंद्र आव्हाडांना ठाकरेंचा ‘दे धक्का!’, टाटा रुग्णालयाला सदनिका देण्याच्या निर्णयाला स्थगिती
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
