Share

बॉलिवूडमधील नामांकित फॅशन डिझायनर्सवर EDकडून कारवाई होण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमधील नामांकित फॅशन डिझायनर रितू कुमार, मुखर्जी आणि मनीष मल्होत्रा यांच्यावर सक्तवसुली संचलनालयानं कारवाई करण्याची तयारी सुरु केली आहे. हे तिघेही भारतातील नामांकित फॅशन डिझायनर्स आहेत. देशभरातील मोठमोठ्या सेलिब्रिटींसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.

सक्तवसुली संचलनालयाने पंजाब मधील एका आमदाराविरोधात मनी लाँण्डरींग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या आमदाराच्या घरी काही वर्षांपूर्वी एक अलिशान लग्नसमारंभ पार पडला होता. या लग्नसमारंभासाठी या तिन्ही डिझायनर्सकडून कपडे घेण्यात आले होते. लाखो रुपयांच्या या कपड्यांचा व्यवहार कॅशमध्ये करण्यात आला. त्यामुळेच या तिघांविरोधात आयकर विभागाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आणि कर चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून ED त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून होती. दरम्यान यांनी एका राजकीय नेत्यासोबत लाखो रुपयांचा रोख व्यवहार करुन कर चोरी केल्याची माहिती ED च्या हाती लागली. त्यामुळं सक्तवसुली संचलनालयाद्वारे लवकरच त्यांना अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या तपासादरम्यान काही महत्वाचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!