पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. यामुळे वीकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवारी पुणे शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, काल(दि. २२ जून) आणि आज(दि. २३ जून) पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसंच, कोरोनामुक्तांच्या आकड्याहून नव्या बाधितांची संख्या अधिक आहे.
शहरात आज नव्याने २८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७६ हजार ४९३ इतकी झाली आहे. तर, २५५ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६५हजार ५६९ झाली आहे.
दरम्यान, पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ३७५ रुग्णांपैकी ३३१ रुग्ण गंभीर तर ४६४ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. आज कोरोनाने ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नानांनी हाती घेतलं ‘धनुष्यबाण’; काँग्रेसने ट्विट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
- उद्धवजी… राज्याच्या समोर समस्यांचा डोंगर… २ दिवसांच्या अधिवेशनात प्रश्न मांडायचे तरी कसे ?
- ‘येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा’; अजितदादांचा कार्यकर्त्यांना आदेश
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- सुप्रिया सुळेंच्या ट्विटनंतर महिला पत्रकार-लेखिका अयुब यांना शिवीगाळ करणाऱ्यांवर गुन्हा दाखल !


