Share

इंडिगोची औरंगाबाद ते दिल्ली, हैदराबाद विमान सेवा ५ जुलैपासून

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाने वर्षभरापासून विस्कळीत झालेली विमानसेवा आता हळूहळू पूर्ववत होत आहे. इंडिगो कंपनीने येत्या ५ जुलैपासून दिल्ली आणि हैदराबाद शहरासाठी विमान सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्योजक, व्यावसायिक आणि पर्यटकांना या विमानसेवेचा मोठा लाभ होणार आहे.

जवळपास दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाने विमान सेवेवर मोठा परिणाम झाला होता. महामारी पूर्वी चिकलठाणा विमानतळावरून दररोज किमान १४ उड्डाणे होत होती. राजधानी दिल्लीसह मुंबई, हैदराबाद, बंगरुळू, अहमदाबाद, उदयपूर आदी शहरे विमानसेवेनी जोडली गेली. उद्योजक, व्यावसायिक तसेच राजकीय नेत्यांच्या प्रयत्नांमुळे शहर पाच ते सहा मोठ्या शहरांशी जोडले गेले. डीएमआयसी सह पर्यटन क्षेत्राला याचा मोठा फायदा झाला होता. इंडिगो, स्पाइस जेट, ट्रू जेट या कंपन्यांनीही विमान सेवा सुरू केली होती.

मात्र महामारी मुळे विमान सेवेला मोठा फटका बसला. सध्या केवळ मुंबई आणि दिल्लीसाठी एअर इंडियाची विमान सेवा सुरू आहे. महामारीचा सर्वाधिक फटका पर्यटन तसेच विमान सेवेला बसला आहे. गेल्या वर्षभरापासून विमानसेवा विस्कळीत झाली. आता इंडिगोने दिल्ली आणि हैदराबाद साठी विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्योजक, व्यवसायिक तसेच पर्यटन क्षेत्राला याचा मोठा फायदा होईल. संसर्ग कमी होत असल्याने आता इतर कंपन्याही विमानसेवा सुरू करण्यास पुढे येतील, अशी अपेक्षा आहे. अशी प्रतिक्रिया टूरिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जसवंतसिंह सिंह राजपूत यांनी दिली.

बुकिंगही सुरू

इंडिगोने येत्या ५ जुलैपासून दिल्ली आणि हैदराबाद साठी विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आठवड्यातून मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी चार दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. त्यासाठी बुकिंगही सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!