Share

…हा शब्द आक्षेपार्ह नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण 

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वापरलेल्या ‘च’ शब्दावरुन त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. शरद पवारांसोबतच एक फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन भाजपने त्यांचा ट्रोल केलं. यानंतर मात्र प्रतिक्रिया देताना संजय राऊत चांगलेच संतापले. ‘त्यावेळी तेथे लालकृष्ण अडवाणी जरी उपस्थित असते तर मी त्यांनाही खुर्ची दिली असती. शरद पवारांची प्रकृती, त्यांचे वय लक्षात घेता महाराष्ट्रातल्या पितृतुल्य, वडीलधाऱ्या माणसाला मी खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राराची संस्कृती नसून विकृती आहे. याच दरम्यान टीका करताना संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्दही उच्चारले आणि त्यावरुनच भाजपने आता संजय राऊतांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र आता यावरच संजय राऊत यांनी ट्वीट करत आपले स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये संक्षिप्त हिंदी शब्दसागर चा संदर्भ देत ‘चुतीया’ शब्दाचा खरा अर्थ सांगणारा एक व्हिडिओ आहे.  त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही ‘चुतीया’ शब्दाचा उल्लेख केलेला दाखवण्यात आले आहे. याचाच संदर्भ देत खासदार संजय राऊत यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे.

‘बार बार देखो हजार बार देखो’ अशा आशयाचे ट्वीट करत ‘चुतीया’ हा आक्षेपार्ह शब्द नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान राऊत यांच्या ‘च’ शब्दावरुन  भाजपने मात्र त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!