🕒 1 min read
मुंबई: १ मे महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी सभा घेत अनेक मोठी वक्तव्ये केली. राज ठाकरेंनी ( Raj Thackeray) पुन्हा एकदा मशिदींवरील भोंग्यांचा विषय काढत राज्य सरकारला ३ मे चा अल्टीमेटम दिला. तर फडणवीस यांनी बाबरी मशिदवरून शिवसेनेवर निशाणा साधला. यालाच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिले आहे.
“फडणवीस म्हणतात, ‘बाबरी आम्हीच (म्हणजे त्यांनी) पाडली. तुम्ही भोंग्यांनाही घाबरता.’ शिवसेनेने घाबरण्याचा किंवा न घाबरण्याचा प्रश्न येतोच कोठे? लोक श्रीरामाचे भजन करतात. भाजपावाले आता ऊठसूट बाबराचे भजन करू लागले आहेत. हा बदल बरा नाही. धमक्या व इशारे देण्यापेक्षा तुम्ही चीनला का व कसे घाबरताय त्यावर बोला. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
लडाखच्या हद्दीत चिनी सैन्य घुसल्यापासून कोणाची कशी हातभर फाटली आहे ते देशाने पाहिले आहे. बाबरी आम्हीच पाडली असे सांगणाऱ्यांना देशात घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नाही. चीननेही गलवान व्हॅलीत २३ भोंगे लावले आहेत व ते देशाला आव्हान देत आहेत की, ‘‘आम्ही येथून बाहेर पडणार नाही!’’ मग ते भोंगेही उतरवा व चिन्यांनाही हाकला. तरच तुम्ही हिमतीचे. असे थेट आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
संभाजीनगरपासून मुंबईपर्यंत शिवसेना हिंदुत्व रक्षणाची ढाल म्हणूनच वावरली आहे, पण या लढाईत भाजपा व त्यांची आजची उपवस्त्रे कोठे होती? आता या मंडळींना हिंदू हिंदूंतच दंगली पेटवायच्या आहेत. मुंबईत मराठी माणसांत फूट पाडण्याचे प्रयत्न झाले, ते यशस्वी झाले नाहीत. आता हिंदूंनाच एकमेकांविरुद्ध मैदानात उतरवायचे हा कावा स्पष्ट दिसतो आहे. अशी टीका करत राऊत यांनी फडणवीस आणि राज ठाकरेंवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या:
- “संभाजीनगरात भाजपच्या उपवस्त्राने…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
- “…त्यामुळे ‘गधा’धारी कोण हे स्पष्ट झालं”, भाजप आणि मनसेच्या सभेवरून संजय राऊत यांचा टोला
- “फडणवीस ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा…”, संजय राऊतांचा खोचक सवाल
- IPL 2022 KKR vs RR : जीवात जीव आला..! सलग पाच पराभवानंतर कोलकातानं नोंदवला विजय; राजस्थानला दिली मात!
- IPL 2022 KKR vs RR : राजस्थानचं कोलकाताला १५३ धावांचं आव्हान; कप्तान सॅमसननं लढवला किल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

