🕒 1 min read
मुंबई: बाबरीचा ढाचा या विषयावर आपले विरोधी पक्षनेते इतके बोलले की, जणू देशात आता कोणतेच विषय शिल्लक राहिलेले नाहीत. बाबरी कोसळली आहे व श्रीरामाचे मंदिर उभे राहिले आहे ही समस्त हिंदू जनांसाठी अभिमानाची बाब आहे, पण आता देशात सगळ्यांना सुखी ठेवणारे ‘रामराज्य’ आणायला हवे असे या लोकांना का वाटत नाही? फडणवीस म्हणतात, ‘बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसेना नेता अयोध्येत नव्हता. तो ढांचा पाडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय, मी तो ढांचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो!’ आता फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून लगावला आहे.
शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल. बाबरी ढांचा कोणी पाडला याबाबत अधिक माहिती महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांच्याकडून घ्यायला हवी. भंडारी आज हयात नाहीत, पण ६ डिसेंबरला दुपारी चार वाजताच भंडारी यांनी भाजपाच्या वतीने स्पष्ट केले की, ‘‘बाबरी पाडण्यात भाजपाचा हात नसून हे कार्य शिवसैनिकांनी केले असावे.’’ भंडारी यांचे हे वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे होते. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
फडणवीस हे त्या उसळलेल्या हिंदू जनसागरातून घुसून बाबरीच्या घुमटावर चढले व हातोडे मारीत राहिले याची नोंद इतिहासाला नसावी? हे आश्चर्यच आहे. मुख्य म्हणजे तेव्हाचे अयोध्या लढ्याचे सेनापती श्री. लालकृष्ण आडवाणी यांनीही ‘बाबरी आम्ही पाडली नाही. बाबरी पडल्याचे कळताच मला धक्का बसला. तो आमच्यासाठी काळा दिवस होता,’ असे स्पष्ट केले होते. त्या काळ्या दिवसासाठी भाजपा आता श्रेय का घेत आहे? व त्यांच्या उपवस्त्रास अयोध्येत का पाठवत आहे? भारतीय जनता पक्षाचे काही सांगता येत नाही. बाबरीचा ढांचा पाडला हे एक राष्ट्रीय कार्यच होते व त्याच्या श्रेयवादाची स्पर्धा इतक्या वर्षांनी करण्यात काय मतलब? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 KKR vs RR : राजस्थानचं कोलकाताला १५३ धावांचं आव्हान; कप्तान सॅमसननं लढवला किल्ला!
- IPL 2022 KKR vs RR : जीवात जीव आला..! सलग पाच पराभवानंतर कोलकातानं नोंदवला विजय; राजस्थानला दिली मात!
- “1857 च्या लढ्यातही फडणवीसांचे मोठे योगदान” आदित्य ठाकरेंची खरमरीत टीका
- “महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष भाड्यावर ठेवलेला पक्ष”; विनायक राऊत यांचा घणाघात
- शरद पवारांच्या भूमिका या ऋतूप्रमाणे बदलतात – सुधीर मुनगंटीवार


