🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात स्पर्धेतील ४७वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने कोलकाताला १५३ धावांचे आव्हान दिले आहे. शेवटच्या चार षटकात राजस्थानला मोठी फटकेबाजी करता आली नाही. कोलकाता संघ नऊपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स नऊपैकी सहा सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. या मोसमातील दोन्ही संघांची ही दुसरी गाठ आहे.
राजस्थानचा डाव
जोस बट़लरसह सलामीला उतरलेला देवदत्त पडिक्कल (२) स्वस्तात बाद झाला. कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने त्याला बाद केले. त्यानंतर बटलरने संयमी फलंदाजी केली. साऊदीने त्याला वैयक्तिक २२ धावांवर बाद केले. कप्तान संजू सॅमसनने संघासाठी झुंज दिली. करुण नायर (१३) मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. १४व्या षटकात सॅमसनने अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या ४ षटकात रियान पराग (१९) आणि संजू सॅमसन (५४) बाद झाले. सॅमसनने आपल्या खेळीत ७ चौकार आणि एक षटकार ठोकला. २० षटकात राजस्थानला ५ बाद १५२ धावा केल्या.
KKR bowl well to restrict a power-heavy RR batting unit to a chasable score ???? #KKRvRR | #IPL2022
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 2, 2022
दोन्ही संघांची Playing 11
कोलकाता नाइट रायडर्स – आरोन फिंच, सुनील नरिन, श्रेयस अय्यर (कप्तान), बाबा इंद्रजीथ (यष्टीरक्षक), नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी.
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), करुण नायर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

