Share

“…त्यामुळे ‘गधा’धारी कोण हे स्पष्ट झालं”, भाजप आणि मनसेच्या सभेवरून संजय राऊत यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्र दिनी मुंबईतील सोमय्या मैदानावर भाजपचा सन्मान सोहळा आणि औरंगाबाद येथे मनसेची सभा पार पडली. या दोन्ही सभांनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका रंगायला सुरुवात झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजप आणि मनसेवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘फडणवीस म्हणतात, बाबरी आम्हीच (म्हणजे त्यांनी) पाडली. तुम्ही भोंग्यांनाही घाबरता. शिवसेनेने घाबरण्याचा किंवा न घाबरण्याचा प्रश्न येतोच कोठे? लोक श्रीरामाचे भजन करतात. भाजपवाले आता ऊठसूट बाबराचे भजन करू लागले आहेत. हा बदल बरा नाही. धमक्या व इशारे देण्यापेक्षा तुम्ही चीनला का व कसे घाबरताय त्यावर बोला. बाबरी आम्हीच पाडली असे सांगणाऱ्यांना देशात घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर ढकलता येत नाही. चीननेही गलवान व्हॅलीत २३ भोंगे लावले आहेत व ते देशाला आव्हान देत आहेत की, ”आम्ही येथून बाहेर पडणार नाही!” मग ते भोंगेही उतरवा व चिन्यांनाही हाकला. तरच तुम्ही हिमतीचे’, असे राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘महाराष्ट्र दिनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या उपवस्त्र पक्षाने सभा घेतल्या. दिशादर्शक असे प्रेरक विचार त्या सभेतून राज्याला मिळतील असे वाटले होते, पण मुख्य पक्ष व त्यांच्या उपवस्त्राने लाथा झाडण्याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे गदाधारी कोण आणि ‘गधा’धारी कोण हे महाराष्ट्र दिनी स्पष्ट झाले. भाजपच्या बुस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेवर तुटून पडले, तर संभाजीनगरच्या सभेत त्यांचे उपवस्त्र शरद पवारांवर तुटून पडले. हे ठरवून झाले. त्यातून महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेला काय मिळाले? उपवस्त्राला बुस्टर देण्याचे काम मुंबईतूनच सुरू होते. पण भाजपाससुद्धा बुस्टर डोसची गरज आहे.’

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!