🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये कोलकाताने पाच पराभवानंतर विजय नोंदवला आहे. लीगच्या ४७व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला (KKR vs RR) ७ गड्यांनी मात दिली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने कोलकाताला १५३ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात रिंकू सिंग आणि नितीश राणा यांच्या भागीदारीमुळे कोलकाताने १९.१ षटकात विजय मिळवला.
कोलकाताचा डाव
आरोन फिंच आणि बाबा इंद्रजीथ यांनी कोलकातासाठी सलामी दिली. वेगवान गोलंदाज कुलदीप सेनने फिंचला (४) तर प्रसिध कृष्णाने इंद्रजीथला (१५) बाद केले. श्रेयस अय्यरने किल्ला लढवत ३४ धावा केल्या. ट्रेंट बोल्टने त्याला यष्टीपाठी झेलबाद केले. रिंकू सिंग आणि नितीश राणा यांनी अर्धशतकी भागीदारी रचली. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कोलकाताने विजयावर शिक्कामोर्तब केले आणि हा सामना ७ गड्यांनी जिंकला. राणाने ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४८ तर रिंकूने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४२ धावा केल्या.
We ????????????. ????????#KKRHaiTaiyaar #KKRvRR #IPL2022 pic.twitter.com/5RaLp51n6C
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 2, 2022
L L L L L W
Nitish Rana and Rinku Singh star as KKR break their losing steak ????#KKRvRR | #IPL2022
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) May 2, 2022
राजस्थानचा डाव
जोस बट़लरसह सलामीला उतरलेला देवदत्त पडिक्कल (२) स्वस्तात बाद झाला. कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने त्याला बाद केले. त्यानंतर बटलरने संयमी फलंदाजी केली. साऊदीने त्याला वैयक्तिक २२ धावांवर बाद केले. कप्तान संजू सॅमसनने संघासाठी झुंज दिली. करुण नायर (१३) मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला. १४व्या षटकात सॅमसनने अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या ४ षटकात रियान पराग (१९) आणि संजू सॅमसन (५४) बाद झाले. सॅमसनने आपल्या खेळीत ७ चौकार आणि एक षटकार ठोकला. २० षटकात राजस्थानला ५ बाद १५२ धावा केल्या.
दोन्ही संघांची Playing 11
कोलकाता नाइट रायडर्स – आरोन फिंच, सुनील नरिन, श्रेयस अय्यर (कप्तान), बाबा इंद्रजीथ (यष्टीरक्षक), नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, उमेश यादव, टीम साऊदी, शिवम मावी.
राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), करुण नायर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल, कुलदीप सेन.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

