Share

“… ही जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना चपराक आहे”, संजय राऊतांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यात महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली. कोल्हापूर उत्तर विधानसभा काँगेसच्या जयश्री जाधव यांनी जिंकली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नीच महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. ९७ हजार ३३२ मते मिळवून त्या विजयी झाल्या. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधत टीका केली आहे.

कोल्हापूर उत्तरेत विजयासाठी भाजपाने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी मोठी यंत्रणा कामास लावली, मोठ्या प्रमाणात पैसाअडका खर्च केला. मतदारांना पैशांचे वाटप करताना भाजपाचे लोक रंगेहाथ पकडले गेले. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात तळ ठोकून बसले. याचदरम्यान ‘मशिदींवरील भोंगे विरुद्ध हनुमान चालिसा’सारखे विषय तापविण्यात आले. या सगळ्यांचा परिणाम कोल्हापूरच्या मतदारांवर झाला नाही व तेथे काँग्रेसच्या जयश्री जाधव या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जिंकून आल्या. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

कोल्हापूरची ही जागा परंपरेने शिवसेनेची. म्हणजे हिंदुत्ववादी विचारांची पाठराखण करणारा हा मतदारसंघ. एखाददुसरा अपवाद वगळता येथे शिवसेनेचेच शिलेदार विजयी झाले. २०१९ साली अटीतटीच्या लढतीत ही जागा शिवसेनेकडून काँग्रेसकडे गेली. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने ही जागा पुन्हा शिवसेनेला मिळावी अशी मागणी होती. तरीही जयश्री जाधवांच्या प्रचार कामात शिवसैनिकांनी झोकून दिले. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत तीन पक्षांनी एकत्रितपणे काम केले व भाजपाचा डाव उधळून लावला. निवडणूक जिंकण्यासाठी जातीय हिंसा घडवू पाहणाऱ्यांना ही चपराक आहे. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!