मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोल्हापूर पोटनिवडणूक संदर्भात म्हटले होते की, ‘‘सत्यजित कदम उभे राहिले तर महाविकास आघाडीला हा असा घाम फुटला. प्रत्यक्ष मी उभा राहिलो असतो तर काय झाले असते त्याचा विचार करा.’’ मात्र कोल्हापूर उत्तर विधानसभा काँगेसच्या जयश्री जाधव यांनी जिंकली आहे. त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. यावरूनच आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
“चंद्रकांत पाटील यांचे बोलणे गांभीर्याने घ्यावे असे नाही. ते काही लोकनेते नाहीत व कोल्हापूरच्या राजकीय परंपरेचा वारसा काय आहे याविषयी त्यांना ज्ञान नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करण्यासाठी ते बराच काळ महाराष्ट्राबाहेर होते. त्यांनी गुजरात राज्यात काम केल्याने त्यांची सध्याच्या भाजपा धुरिणांशी जवळीक झाली व त्याच नात्याने त्यांच्या हाती महसूलमंत्री पदाचे कलिंगड लागले हेच सत्य आहे. मागच्या निवडणुकीत पाटील कोल्हापुरातून कोथरूडला गेले व निवडून आले. तेथेही निवडून येताना त्यांना काय घाम फुटला होता ते महाराष्ट्राने पाहिले. म्हणजे पाटील आता त्या अर्थाने कोल्हापूरचे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते निवडणुकीस उभे राहिले असते तर वेगळे चित्र दिसले असते या बेडक्या फुगविण्यात अर्थ नाही. पाटील उभे राहिले असते तर काय सांगावे, जयश्री जाधवांच्या मतांचा आकडा लाखावरही गेला असता.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
तसेच चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ अशीही घोषणा केली होती. त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे कारण…”, संजय राऊतांचा टोला
- IPL 2022 CSK vs GT : मिलरच्या ‘किलर’ खेळीमुळं गुजरातचा विजय..! चुरशीच्या लढतीत चेन्नईला दिली मात
- भारताच्या चेतेश्वर पुजाराचा इंग्लंडमध्ये ‘डबल’ धमाका; द्विशतकही ठोकलं आणि…! पाहा VIDEO
- IPL 2022: ‘प्लेयर ऑफ द मॅच’ उमरान मलिकचे मोठे वक्तव्य; म्हणाला “माझे काम वेगाने फलंदाजांना…”
- IPL 2022 CSK vs GT : पुण्यात दिसला ऋतुराजचा स्पार्क! गुजरातपुढे १७० धावांचे लक्ष्य


