Share

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे कारण…”, संजय राऊतांचा टोला

Published On: 

मुंबई: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. त्यात महाविकास आघाडी सरकारने बाजी मारली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हिमालयात कधी जाणार या चर्चांना उधान आले. कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीमध्ये पराभूत झाल्यास हिमालयात जाणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यावरूनच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा काँगेसच्या जयश्री जाधव यांनी जिंकली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नीच महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. ९७ हजार ३३२ मते मिळवून त्या विजयी झाल्या. या मतदारसंघात भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मिळालेली ७८ हजार २५ मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे प्रांताध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या होम ग्राऊंडवर ही पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता. ‘‘कोल्हापुरात एखादी पोटनिवडणूक झाली तर मी ती लढवीन व जिंकून येईन’’ असे आव्हान पाटलांनी दिले होते, पण प्रत्यक्ष पोटनिवडणूक लागताच ते गायब झाले. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनी या निवडणुकीत पराभव झाला तर राजकारण सोडून आपण हिमालयात जाऊ अशीही घोषणा केली होती.  त्यांना ही संधी कोल्हापूर उत्तरच्या निवडणूक निकालाने दिली होती. ती त्यांनी साधायला हवी होती, पण आता पाटील यांनी त्यावरून पलटी मारली आहे आणि सारवासारव केली आहे. अर्थात चंद्रकांत पाटील यांनी हिमालयात न जाता महाराष्ट्रातच राहावे. कारण ते येथे राहतील तोपर्यंत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विजयी होत राहील. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!