मुंबई: आयपीएल २०२२ चा २८ वा सामना पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला गेला. ज्यामध्ये SRH ने या मोसमात सलग चौथा विजय नोंदवला आहे. यात ८ गुणांसह हैदराबाद आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे. पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात सर्वात जास्त प्रभावित वेगवान गोलंदाज उमरान मलिकने केले आहे. ज्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला आहे.
‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरलेल्या उमरान मलिकने (Umran malik) आनंद व्यक्त करत सांगितले, “मी आज काही संथ गतीच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, यॉर्कर्स करण्याचा प्रयत्न केला. मी त्या षटकात बाऊन्सर टाकला नव्हता (ज्यामध्ये त्याने जितेश शर्माला बाद केले होते), मला वाटले की तो पुल शॉटच्या जागी बरोबर बसला असावा आणि तेच झाले. मी स्वतः कॅच पकडू शकतो, मी एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. माझे काम फलंदाजांना वेगाने घाबरवणे आहे.”
पंजाबचा डाव १५१ धावांवर आटोपण्यात हैदराबादचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचा मोठा वाटा होता. त्याने डावातील शेवटचे षटक टाकले होते आणि ३ विकेटही आपल्या नावावर केल्या होत्या. त्याने ७ च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करताना ४ षटकांच्या स्पेलमध्ये २८ धावांत ४ बळी घेतले. या चमकदार कामगिरीमुळे त्याला सामन्यानंतर ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताबही मिळाला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 CSK vs GT : पुण्यात दिसला ऋतुराजचा स्पार्क! गुजरातपुढे १७० धावांचे लक्ष्य
- IPL 2022 : आकाश चोप्राने साधला पंजाबच्या ‘या’ बॉलरवर निशाणा; म्हणाला “तो नेहमी ४० धावा देतो”
- IPL 2022 : एक मॅच दोन रेकॉर्ड..! पंजाबविरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार चमकला; ठोकलं दीडशतक!
- IPL 2022 : ऋषभ पंतने मोडला विराट कोहलीचा ‘हा’ खास रेकॉर्ड, बनला अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
- क्लास इज पर्मनंट..! IPL 2022 दरम्यान CSKच्या माजी खेळाडूनं इंग्लंडमध्ये ठोकलं शतक; पाहा VIDEO!


