🕒 1 min read
मुंबई : उद्या मुस्लिम बांधवांचा पवित्र सण अर्थात रमजान ईद. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “ईद म्हणजे दयाभाव आणि दातृत्व सांगणारा सण. हा सण सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, सुख, समाधान घेऊन येवो”. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “रमजानच्या पवित्र महिन्यात काल 29 व्या दिवशी चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे आज 30 वा रोजे पूर्ण करुन उद्या, 3 मे मंगळवारी रमजान ईद साजरी केली जाणार आहे”. रमजानच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम बांधवांना पवित्र ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“दयाभाव आणि दातृत्व यांचे महत्त्व सांगणारा हा सण आहे. सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देणारे हे पर्व सर्वांच्या जीवनात सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –


