Share

“1857 च्या लढ्यातही फडणवीसांचे मोठे योगदान” आदित्य ठाकरेंची खरमरीत टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बाबरी मशीद पाडण्यात माझाही सहभाग होता, आपण त्यावेळी तिथे उपस्थित होतो, असा दावा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर शिवसेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. १८५७च्या लढ्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. पण या गोष्टीत जाण्यापेक्षा, या वादात जाण्यापेक्षा राम मंदिर चांगलं होत आहे. कोर्टाने निकाल चांगला दिला. शिवसेनेने संघर्ष केला. चांगलं काम होत आहे. आता महाराष्ट्रासमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे. त्यावर राजकीय पक्षांनी बोललं पाहिजे. चर्चा केली पाहिजे. आम्ही विकासाची कामं करत आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच आदित्य ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचं भाषण बघितलं नाही, त्यामुळे त्यावर वक्तव्य करता येणार नाही.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?

“बाबरी पाडण्यासाठी मी स्वतः उपस्थित होतो” देवेंद्र फडणवीसांचा दावा!या सभेत बाबरी मशीद पाडताना एकही शिवसैनिक उपस्थित नव्हता. परंतु, बाबरी पाडताना मी उपस्थित होतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. बाबरी प्रकरणी ३२ आरोपी भाजपमधील होते. त्यात शिवसेनेच्या एकाचाही समावेश नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली होती “काही जणांना वाटतं आपण म्हणजेच महाराष्ट्र आहोत, आपण म्हणजेच मराठी आहोत पण, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तर अठरापगड वर्गातले लोक, १२ कोटी लोकसंख्या म्हणजे महाराष्ट्र आहे,” असं अप्रत्यक्षपणे फडवीसांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!