Share

‘तृणमूल कॉंग्रेस तर सत्तेवर आली आहे, आता फक्त…’; संजय राऊतांचा टोला

Published On: 

मुंबई: गोवा येथील विधानसभा निवडणूक (Goa Elections) तोंडावर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेना १८ आणि १९ तारखेला गोव्यात पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. ते सकाळी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजप सोबतच तृणमूल आणि आप पक्षावर देखील टीका केली आहे.

संजय राऊत भाजपवर टीका करताना म्हणाले, गोव्यात फक्त १०-१२ लोक राजकारण करतात. तेच भूमाफिया आहेत. सध्या भाजपमध्ये प्रवेश केलेले लोक देखील ड्रग्स माफिया आहे. गोव्यातील (Goa) राजकारण प्रस्थापितांच्या हातात गेलंय. भ्रष्टाचारी, ड्रग्स माफियांच्या हातात गोव्याचं सुत्र आहे. ते मोडीत काढायचं असेल आणि गोव्याचे ‘कॅरेक्टर’ सुधरवायचे असेल तर गोवेकरांनी सामान्य माणसाला निवडून आणायला पाहिजे. गोव्यात हे होणं गरजेचं आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

तृणमूल कॉंग्रेसवर बोलताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना गोव्यात १८ आणि १९ तारखेला गोव्यात पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार आहे. पण, गोव्यात तृणमूल काँग्रेसची (TMC) वावर पाहता ते मनाने सत्तेवर आलेले आहेत. आता फक्त शपथ घ्यायची बाकी आहे, असा खोचक टोला त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना लगावला. तर दिल्लीत कोरोना वाढत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री गोव्यात लोकांच्या दरवाज्यावर जाऊन प्रचार करत आहेत, असा टोला अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!