Share

मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, ‘हे केंद्राचं नाही तर महाराष्ट्राचं सरकार आहे’

Published On: 

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला आजारी असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. त्यांच्या ऐवजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंतप्रधानांच्या बैठकीला हजेरी लावली. मात्र यावरूनच भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका साधायला सुरुवात केली. मुख्यमंत्री ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ या सुविधेचं लोकार्पण करण्यासाठी उपस्थित असतात, मग पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीला का नाही, असे सवालही भाजप नेत्यांनी केले. दरम्यान यावरच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार(Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेत भाजपवर टीका केली आहे.

‘मंत्र्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं, या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांना सवय आहे. पण पंतप्रधानांच्या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री हजर असताना, मुख्यमंत्री का उपस्थित राहिले नाहीत अशी टीका करणाऱ्या या नेत्यांनी हे केंद्राचं नाही तर महाराष्ट्राचं सरकार आहे, हे लक्षात घ्यावं. असे ट्वीट करत रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेतल्याचे दिसते.

तसेच ‘तौक्ते वादळाच्या वेळेस आदरणीय पंतप्रधानांनी शेजारच्या राज्याची पाहणी करून त्यांना तातडीने हजार कोटी रुपयाची मदत केली. आणि त्याचवेळी महाराष्ट्राला मात्र सापत्न वागणूक दिली. त्यावेळी मूग गिळून गप्प बसणारे भाजप नेते आज मात्र चढाओढीने मुख्यमंत्र्यांवर टीका करतात, हे आश्चर्यकारक आहे.तसेच केवळ केंद्रीय नेतृत्वाला खूष करून त्यांची मर्जी सांभाळण्याची राजकीय भूमिका भाजपच्या नेत्यांकडून नेहमीच घेतली जाते. पण या राज्याचे आपण देणे लागतो, या भूमिकेतून कधीतरी राज्याच्या हिताची भूमिका घेण्याचं शहाणपण ज्या दिवशी त्यांना येईल, तो राज्यासाठी सुदिन असेल. असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!