मुंबई : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदावरून आता महाविकासआघाडीतील शिवसेना – कॉंग्रेस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहेत. युपीएच्या अध्यक्षपदावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावं, असं म्हटलं होतं. राऊतांच्या या विधानावर काँग्रेस नेते आता आक्रमक झाले आहेत.
संजय राऊत यांनी UPA चे अध्यक्षपद शरद पवार यांना मिळावे, अशी मागणी केली होती. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल विचारला होता. तसेच शिवसेना UPA चा भाग नाही, त्यामुळे संजय राऊत यांनी संबंध नसलेल्या विषयाबाबत बोलू नये, असे खडे बोलही सुनावले होते.
त्यावर आता संजय राऊत यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदाचा विषय हा केंद्रातील चर्चेचा विषय आहे. राज्यातील किंवा जिल्हा-तालुका स्तरावरील नेत्यांनी यावर बोलू नये, असा टोला संजय राऊत यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.
दरम्यान, हा दिल्लीतील विषय आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी यामध्ये पडू नये. सोनिया गांधी किंवा राहुल गांधी याविषयी काही बोलले तर आम्ही उत्तर देऊ. देशात विरोधी पक्षांची सक्षम आघाडी उभी राहिली नाही तर भाजपचा पराभव कसा करणार, याचं उत्तरही या नेत्यांनी दिल्लीत बसून द्यावं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्यामुळे आता यावर नाना पटोले काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- प्रार्थना उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर उत्तम चित्रकार पण, पहा फोटो…
- दीपाली चव्हाण यांची आत्महत्या आहे की खून याचा तपास झालाच पाहिजे : भाजप
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भाजपाचे नेते किंमत देत नाहीत, काँग्रेस नेत्याचा आरोप
- भारताची Playing XI ; सूर्यकुमार यादव की ऋषभ पंत अय्यरची जागा कोण घेणार?
- कॅन्टीन चालवू देण्यासाठी एक लाखाची लाच; महिला सहाय्यक निरीक्षकावर गुन्हा दाखल


