Share

भारताची Playing XI ; सूर्यकुमार यादव की ऋषभ पंत अय्यरची जागा कोण घेणार?

Published On: 

पुणे : पुणे येथे झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने 66 धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना शुक्रवारी पार पडेल. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली. या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांमधून बाहेर व्हावे लागले आहे.

आता दुसऱ्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत टीम इंडियात एका नवीन खेळाडूला जागा मिळू शकते. इंग्लंडविरुद्ध ट्वेन्टी-२० क्रिकेट कारकीर्दीला झोकात प्रारंभ करणाऱ्या सूर्यकुमार यादवला दुसऱ्या वनडेत पदार्पणाची संधी मिळू शकते. ३६० अंशांमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता असलेला सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर अय्यरची जागा घेऊ शकतो. पण कर्णधार कोहली आणि संघव्यवस्थापनाकडे ऋषभ पंतचाही पर्याय आहे.

ऋषभ पंत हा देखील इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी आणि टी-२० मालिकेत भन्नाट फॉर्ममध्ये होता. त्यामुळे आता सूर्यकुमार आणि पंत यांच्यापैकी कोणाला संधी मिळते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. सलामीवीर रोहित शर्माच्या कोपराला दुखापत झाली असली तरी तो दुसऱ्या सामन्यासाठी तंदुरुस्त असेल, असे सांगण्यात येत आहे. रोहितला विश्रांती दिल्यास शुबमन गिल याला संधी मिळू शकेल, तर के. एल. राहुल मधल्या फळीत फलंदाजीला उतरेल. एकदिवसीय मालिकेसाठी राहुलकडेच यष्टिरक्षणाची जबाबदारी राहील, तर ऋषभ पंतचा फलंदाज म्हणून मधल्या फळीसाठी विचार होऊ शकेल.

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल (यष्टिरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, थंगरासू नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!