Share

दीपाली चव्हाण यांची आत्महत्या आहे की खून याचा तपास झालाच पाहिजे : भाजप

Published On: 

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी आज व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दिपालीला एक उच्चपदस्त वन अधिकारी नेहमी अपमानास्पद वागणूक देत होते. दोन-चार दिवसांपूर्वी ते अधिकारी येऊन गेले, त्यावेळी दिपाली चव्हाण यांना त्यांनी झापल्याची माहिती आहे.

दिपाली यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाकला जाणारा दबाव व मानसिक त्रासाला कंटाळून दिपाली यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी 4 पानांचं सुसाईट नोट लिहल्याची माहिती कळतेय. त्यात काय लिहलंय हे अद्याप कळू शकले नाही.

दरम्यान,मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या दोषी अधिकाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची कुटुंबाची आणि वनपाल-वनरक्षक संघटनेची माहिती.मृतदेह पोलीस अधीक्षक किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे.रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणाऱ्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अधिकाऱ्याने अशा पद्धतीने जीवन संपविल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

दरम्यान, आता या घटनेनंतर भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. 28 वर्षीय वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी जबाबदार असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

काल रात्री दीपाली चव्हाण यांनी हरिसाल येथे स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही आत्महत्या आहे की खून याचाही तपास लागला पाहिजे. दीपाली चव्हाण यांना DCF शिवकुमार टोकाचा त्रास देत होते, यासारख्या अनेक लेखी तक्रारी त्यांनी वारंवार केल्या होत्या. मात्र, वनसरंक्षक रेड्डी यांनी दखल घेतली नाही. भ्रष्ट वन अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून दीपाली चव्हाण या महिलेचा बळी गेला. या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!