🕒 1 min read
मुंबई : कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडत असते. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवणे देखील तो त्यांच्यासाठी आनंद क्षणाचा असतो प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. असाच काहीसा छंद मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेलाही सुद्धा आहे .
प्रार्थना उत्तम अशी चित्रकार आहे. आणि हो ती खूप सुंदर चित्र रेखाटते नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पेंटिंग पोस्ट केले आहे. महत्वाचे म्हणजे तिनी हे केलेले पेंटिंग हे घराच्या भिंतीवर आहे. हे सुंदर पेंटिंग पाहून चाहते त्या पोस्टला भरभरून लाईक आणि त्यासोबत कमेंट्स देखील करत आहेत. चाहतेच नव्हे तर, कलाकार देखील लाईक कमेंट्स आणि कौतुक करताना दिसत आहेत. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, व्हॉट्स अॅप लग्न अशा सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. आणि त्यासोबतच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत आहे.
https://www.instagram.com/p/CMy1hZLMxiE/?utm_source=ig_web_copy_link
नुकतेच तिने सांगितले, आज पर्यंत मी खूप भूमिका साकारल्या आहे मात्र चित्रपटांची निवड करताना मी सध्या विचारपूर्वक निर्णय घेते. चित्रपटसृष्टीत एंट्री करताना वाट्याला आलेले चित्रपट तिने पटापट निवडले. यावेळी स्क्रीप्ट काय, दिग्दर्शक कोण, कलाकार कोण, भूमिका काय, निर्माता कोण असा विचार कधीच केला नसल्याचे प्रार्थनाने यावेळी सांगितले. मात्र, आता चित्रपटांची निवड करताना विचारपूर्वक निर्णय घेते असं प्रार्थनाने म्हटलं होते. या कामात पतीही तितकीच मदत करतो असंही तिने सांगितले होते. कुणी काही सांगितलं तरी जे पटतं तेच करते असंही तिने स्पष्ट केले होते.
https://www.instagram.com/p/CMzCfH1An96/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- नाव परमवीर आणि संपत्ती बकासुरासारखी ? चाकणकरांनी मांडला सिंग यांच्या संपत्तीचा लेखाजोगा
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- मॉडल मिलिंद सोमणला कोरोनाची लागण
- आ.पवार यांचा जिल्हाधिकारी यांना इशारा वीज कनेक्शन जोडा, अन्यथा आंदोलन करू
- भारताविरुद्ध पदार्पणासाठी इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन उत्सुक, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
