परभणी: परळी येथील रेल्वे पोलीस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर लाच घेण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅट्रॉसिटी गुन्ह्यात मदत तसेच रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन चालवू देण्यासाठी एक लाखाची लाच सहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली होती. परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी मिळालेल्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदाराने तक्रार दिल्यानुसार परळी रेल्वे पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी मुंढे तसेच पोलीस ठाण्यातील कर्मचारी संजय भेंडेकर व दयाराम पवार हे आपल्या विरोधात असलेली अॅट्रॉसिटीची केस मागे घेण्यासाठी तसेच रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन चालवू देण्यासाठी एक लाख रुपये दे, अशी मागणी केल्याचे म्हंटले आहे. या तक्रारीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोन्ही कर्मचाऱ्यांना पकडले.
लाच घेण्यासाठी दोघे कर्मचारी घटनास्थळी आले होते, तेव्हा पथकाने रचलेल्या सापळ्यात दोघे अडकले. महिला सहाय्यक निरीक्षक माधुरी मुंढे लाच स्वीकारताना घटनास्थळी आल्या नाहीत, मात्र त्यांनी पडताळणी दरम्यान लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याची महिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भारत हुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या
- नाव परमवीर आणि संपत्ती बकासुरासारखी ? चाकणकरांनी मांडला सिंग यांच्या संपत्तीचा लेखाजोगा
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- मॉडल मिलिंद सोमणला कोरोनाची लागण
- आ.पवार यांचा जिल्हाधिकारी यांना इशारा वीज कनेक्शन जोडा, अन्यथा आंदोलन करू
- भारताविरुद्ध पदार्पणासाठी इंग्लंडचा लियाम लिव्हिंगस्टोन उत्सुक, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

