Share

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भाजपाचे नेते किंमत देत नाहीत, काँग्रेस नेत्याचा आरोप

Published On: 

नवी दिल्ली : भाजपाच्या आणि कॉंग्रेसच्या नेत्यामाध्यें देशातील अनेक मुद्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतात. यादरम्यान पक्षातील नेते अनेकदा वादग्रस्त विधान करीत असतात. असच एक विधान काँग्रेसचे नेते उदित राज यांनी केल आहे. भाजपामध्ये दलित नेत्यांना काडीची किंमत नाही. अगदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडून अशीच वागणूक दिली जाते, असा आरोप काँग्रेसचे नेते उदित राज यांनी केला. एका हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान हा किस्सा घडला.

या चर्चेदरम्यान भाजपाचे प्रवक्ते प्रेम शुक्ला, ‘माझी भाजपमध्ये राहण्याची लायकी नव्हती’ असे बोलून गेले. यावर उदित राज यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा उदित राज यांनी आक्रमक होऊन भाजपवर प्रहार करायला सुरुवात केली. तेव्हा भाजपाच्या प्रवक्त्याने देशाचे राष्ट्रपती दलित आहेत, असे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यावर उदित राज म्हणले कि, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भाजपाचे नेते किंमत देत नाहीत. रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर उभे राहतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपतींनी हात जोडून नमस्कार केला तर मोदी त्यांचं अभिवादनही स्वीकारत नाहीत, असा आरोप उदित राज यांनी यावेळी केला.

उदित राज यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला भाजपाचे प्रवक्ते प्रेम शुक्लाही म्हणाले कि, काँग्रेसमध्येच दलितांना कोणतीही किंमत नाही. भाजपने तुम्हाला खासदार केले, पण काँग्रेसने तुम्हाला काय दिले? तुमची काँग्रेसमध्ये काय पत आहे?, असा सवाल प्रेम शुक्ला यांनी उदित राज यांना केला.

या सगळ्या चर्चे नंतर उदित राज यांनी भाजपाच्या प्रेम शुक्ला यांचे आभार मानले. तुम्ही आज खरी गोष्ट जगासमोर आणलीत. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी लोकांना कळाली. तसेच खासदारकीच्या उमेदवारीसाठी भाजप माझ्या दारावर आली होती. नंतरच्या काळात भाजपने माझी व्होटबँक फोडली, असा पलटवारही उदित राज यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!