मुंबई : वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक डबघाईला आला आहे. गेले अनेक महिने सातत्याने या किमतीत वाढ होत होती. सर्वसामान्यांकडून केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला जात होता. याच पार्श्वभूमीवर केंद्राने दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 5 रुपयांची कपात करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारला पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची मागणी करत आहे. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
5 रुपये, 2 रुपये, सव्वा रुपया जसं महाराष्ट्रात किंवा मुंबईत हे एनसीबीची लोक ड्रग्ज पकडतात. अर्धा ग्रॅम, 1 ग्रॅम आणि गाजवाजा करतात. गुजरातमध्ये काल 300 किलो पकडलं, त्याच्या आधी 4000 किलो पकडलं, त्याच्यावरती गाजावाजा करत नाहीत. आधी तुम्ही 150 रुपये वाढवायचे आणि नंतर रुपया, सव्वा रुपया कमी करायचे हे धंदे बंद करा, असं म्हणत संजय राऊतांनी केंद्रावर ताशेरे ओधले आहेत.
13 राज्यांतील निवडणुकीत पराभव झाल्यावर भाजपने 5 रुपयांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. जर हे दर 50 रुपयांनी करायचं असेल तर देशात भाजपला पराभूत करावं लागेल. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये महागाई विरोधात आंदोलन होत आहे. ते सुरु आहे. संभाजीनगरला केंद्र सरकारने लादलेल्या महागाईविरोधात विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. त्याच मी नेतृत्व करत आहे, असंही राऊतांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ऐन दिवाळीत २ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय’
- …तर असे साखर कारखाने स्वाभिमानी शेतकरी संघटना चालू देणार नाही- राजू शेट्टी
- हिंदुत्वाची तुलना आयएसआयएसशी करणे चुकीचे- गुलाम नबी आझाद
- ‘काळानुरूप बदलली तरच सहकार चळवळ टिकेल’, गडकरींनी व्यक्त केली अपेक्षा
- कोरोनाविरोधातील लढा अंतिम टप्प्यात, परंतु…- मनसुख मंडाविया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

