Share

Sanjay Raut : “नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून…”, संजय राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान मोदी हे कपड्यांचे व रूप पालटून फिरण्याचे शौकीन आहेत, पण फडणवीसही तेच करू लागले. त्यांनी शिंदे यांना भेटायला जाताना काही वेळेस नकली दाढी-मिश्याही लावल्या असाव्यात. हे सर्व रहस्य त्यांच्या पत्नी सौ. अमृता यांनी फोडले नसते तर या महान कलावंताची महाराष्ट्राला ओळखच झाली नसती. सौ. फडणवीस यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. श्री. मोदी यांचे अनुकरण त्यांच्या लोकांनी किती करावे ते पहा. श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सत्तांतर घडवून आणण्यासाठी जे वेषांतर केले ते सर्व कपडे व ऐवज पुढील पिढीसाठी एखाद्या संग्रहालयातच ठेवले पाहिजेत. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोक मधून लगावला आहे.

बगदादचा खलिफा हरुन-अल-रशीद अनेकदा वेषांतर करून त्याच्या राज्यात रात्रीचा फिरत असे, पण तो का फिरत असे? आपल्या राज्याचे प्रशासन, सरदार प्रजेशी नीट वागत आहेत ना? प्रजेला काय समस्या आहेत? आपले राज्य नीट चालले आहे ना? राज्यकारभार करताना आपल्याला कोणी फसवत तर नाही ना? हे जाणून घेण्यासाठी; पण नागपूरचे व ठाण्याचे हरुन-अल-रशीद वेषांतर करून भेटत होते ते बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याचे कारस्थान तडीस नेण्यासाठी. हरुन-अल-रशीद हा उत्तम खलिफा, पण बगदादला जसा चांगला राजा होता तसा चोर व लुटारूंचा सुळसुळाट होता. ‘थीफ ऑफ बगदाद’ किंवा ‘अलिबाबा चाळीस चोर’ या सर्व कथा आणि दंतकथा बगदादशी संबंधित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लाभलेले नवे हरुन-अल-रशीद नक्की काय करणार? असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

गुवाहाटीस गेलेल्या आमदारांची ‘रेडा’ अशी हेटाळणी केली म्हणून ते नाराज झाले व त्यामुळे ते शिवसेनेतून बाहेर पडल्याची बतावणी सुरू आहे हा गैरसमज आहे. ‘टोणगा’ हा वाप्रचार आपल्याकडे सर्रास वापरला जातो. अत्रे-ठाकरे यांनी ते जाहीर सभांतून वापरले आहे. रेडा हे हिंदू संस्कृतीचे प्रतीक आहे. इतर देवतांप्रमाणे मृत्युदेवता, यमदेवता आहे. त्या देवतेचे वाहन रेडा आहे. शंकराच्या नंदीइतकेच रेडय़ालाही हिंदू संस्कृतीत महत्त्व आहे हे नवहिंदुत्ववादी विसरलेले दिसतात. ज्ञानेश्वरांनी ‘वेद’ म्हणवून घेण्यासाठी रेडय़ाचीच निवड केली. ‘यमा’स धर्मराज, सूर्यपुत्र अशा अन्य नावांनी ओळखले जाते. ‘यम’ हा ‘काळ’ म्हणून ओळखला जातो व रेड्याशिवाय त्या काळाचे महत्त्व नाही. हिंदुत्वाचा हा अध्याय आहे. शिवसेना सोडून वेगळय़ा गटात गेलेल्या आमदारांनी हा हिंदुत्वाचा अध्याय समजून घेतला पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!