Share

Alok Nath : बॉलिवूड संस्कारी बाबूजी ‘आलोक नाथ’ यांच्यावर खऱ्या आयुष्यात आहेत गंभीर आरोप

Published On: 

Alok Nath | मुंबई : बॉलिवूडचे संस्कारी बाबूजी या नावाने आलोक नाथ यांना ओळखल जातं. त्यांच्या चित्रपटांतील भूमिकांमुळेच त्यांना ‘संस्कारी बाबूजी’ची भूमिका मिळाली. अभिनयाच्या दुनियेत बाबूजींनी जेवढी कमाई केली होती, तेवढीच ते खऱ्या आयुष्यातही वादात सापडले होते.

आलोक नाथ यांनी अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या मात्र त्यांना वडिलांच्या भूमिकेत जास्त पसंती मिळाली. आलोक नाथ यांनी अनेक स्टार्सच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. एवढेच नाही तर वयाच्या ३४ व्या वर्षी ‘अग्निपथ’ चित्रपटात ४८ वर्षीय अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. पण या सुसंस्कृत बाबूजींचे जीवन वादांनी भरलेले आहे. त्याच्यावर अनेक गंभीर आरोपही करण्यात आले आहेत.

८० च्या दशकात नीना गुप्ता आणि आलोक नाथ यांच्या अफेअरच्या बातम्या आल्या होत्या. दोघे अनेकदा एकत्र दिसले. माहितीनुसार, त्यावेळी टीव्ही सीरियल ‘बुनियाद’मध्ये नीनाने आलोकच्या सुनेची भूमिका साकारली होती आणि यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

माहितीनुसार, २०१८ मध्ये इंडस्ट्रीतील अनेक महिलांनी त्याच्यावर विनयभंग आणि जबरदस्ती केल्याचा आरोप केला होता. निर्मात्या विनिता नंदा यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे खुलासा केला होता की आलोक नाथ यांनी दारूच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्री दीपिका अमीननेही त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!