“दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही म्हणूनच…”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

नागपूर: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut)आगामी  नागपूर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी काल (२१ एप्रिल) “नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”,असा टोला संजय राऊत यांना लगावला होता. यावरच संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

“दुर्देवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणूनच तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं. जर तुम्हाला त्यावेळी सुबुद्धी आली असती की, शिवसेना हा आपला मित्र पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष आहे. आपण त्या मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे तर आज आपण कदाचित मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देत आहात.”, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान नागपूर महानगर पालिका निवडणुक संदर्भात पक्षाची बांधणी करण्यासाठी आपण नागपुरात आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. जर शिवसेना वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजेत. नागपूर उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे आणि एकेकाळी शिवसेनेची ताकद येथे चांगली होती. आमच्यासारखे नेते येतात तेव्हा लोक जमतात, अनेक मान्यवर येतात. या सर्वांना पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याला कसा आकार देता येईल ते बघू. यावरच नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता.

महत्वाच्या बातम्या :