Share

IPL 2022 MI vs CSK : चेन्नईचा चौधरी चमकला..! मुंबईचं चेन्नईला १५६ धावांचं आव्हान

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज ‘एल क्लासिको’ म्हटल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात सामना रंगत आहे. चेन्नईचा कप्तान रवींद्र जडेजाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात मुंबईने चेन्नईला १५६ धावांचे आव्हान दिले आहे. मुकेश चौधरीच्या (१९ धावांत ३ बळी) भेदक माऱ्यामुळे मुंबईची वरची फळी उद्ध्वस्त झाली. तिलक वर्माने नाबाद अर्धशतक ठोकत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

मुंबईचा डाव

चेन्नईचा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरीने भेदक स्पेल टाकत मुंबईला दु: खद सुरुवात करून दिली. त्याने पहिल्या तीन फलंदाजांना बाद केले. रोहित शर्मा आणि इशान किशन शून्यावर तंबूत परतले. मुकेशने इशान किशनचा भन्नाट यॉर्करवर त्रिफळा उडवला, तर रोहित आणि डेवाल्ड ब्रेविसला (४) झेलबाद केले. त्यानंतर सूर्यकुमारने ३ चौकार आणि एका षटकारासह ३२ धावांची खेळी केली, पण मिचेल सँटनरला चुकीचा फटका खेळताना बाद झाला. त्यानंतर पदार्पणवीर ह्रतिक शोकीन यांनी संघासाठी महत्त्वपूर्ण धावा केल्या, शोकीनने २५ धावांची संयमी खेळी केली. १४व्या षटकात त्याला ड्वेन ब्रावोने बाद केले. १५व्या षटकात मुंबईने शतक साकारले. त्यानंतर तिलक वर्माने संघाचा दबाव दूर करत धावा जोडल्या. या सामन्यात चेन्नईने सुमार श्रेत्ररक्षण केले. तिलकने १९व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात मुंबईने १६ धावा कुटल्या. २० षटकात मुंबईने ७ बाद १५५ धावा केल्या. मुकेश चौधरीने १९ धावांत ३ बळी घेतले. ब्राव्होने २ फलंदाजांना माघारी धाडले.

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कप्तान), एमएस धोनी (यष्टीरक्षक.), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, महेश थिक्षना, मुकेश चौधरी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!