Share

पर्यावरण व हवामानाचा योग्य समतोल राखून वसुंधरेला संरक्षित करण्याचा निर्धार करा- शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वाढते शहरीकरण, बेसुमार वृक्षतोड, हानिकारक वायू, सांडपाण्यामुळे दूषित होणारे जलस्रोत यामुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. भूमीवरील नैसर्गिक जलस्रोत व साधन संपत्तीचे संवर्धन हे अत्यावश्यक आहे. पर्यावरण व हवामानाचा योग्य समतोल राखून वसुंधरेला संरक्षित करण्याचा निर्धार करूया. असे आवाहन राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार (sharad pawar) यांनी जागतिक वसुंधरा दिनी केले आहे.

सोबतच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही “समतोल राखू पर्यावरण आणि हवामानाचा, संकल्प करू समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा… पृथ्वीने आपल्याला भरभरून दिले, आता आपली वेळ आहे तिचे संवर्धन करण्याची. पर्यावरणाचे संवर्धन ही उद्याच्या उज्वल भविष्यासाठीची मूलभूत गरज आहे. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त हा संकल्प करूया.”, असे आवाहन केले आहे.

तर पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असून  हाच संदेश देण्यासाठी वसुंधरा दिन आपण पाळतो. चला, समृद्ध आज आणि उद्यासाठी पर्यावरण जपूया. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!