Share

IPL 2022 : बापरे बाप..! मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात घुसल्या ‘मधमाशा’ आणि मग पुढे…! पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) हे दोन दिग्गज संघ आमनेसामने येणार आहेत. विक्रमी पाच वेळा चॅम्पियन मुंबई संघासाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम आतापर्यंत काही खास राहिलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ चालू मोसमातील पहिल्या विजयाची वाट पाहत आहे. सलग सहा सामने गमावून संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. चेन्नईविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी ‘करो-डाय’चा आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी मुंबईच्या खेळाडूंवर अचानक मधमाशांच्या थव्याने हल्ला केला, त्यामुळे सराव करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. अठरा सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, मधमाशांचा एक मोठा थवा मैदानावर घिरट्या घालत आहे. मैदानावर मधमाशा शिरताच मुंबईचे खेळाडू आणि प्रशिक्षक यांना जमिनीवर झोपावे लागले. हा थवा निघून गेल्यानंतर मुंबईच्या खेळाडूंनी पुन्हा सरावाला सुरुवात केली.

क्रिकेटच्या मैदानावर अचानक मधमाशांनी अशा प्रकारे हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा सामन्यादरम्यान खेळाडू आणि पंचांना अशा परिस्थितीमुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यातील सामना आज २१ एप्रिल (गुरुवार) रोजी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणार आहे. मुंबई १० संघांच्या गुणतालिकेत तळाशी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!