Share

IPL 2022 MI vs CSK : महासामन्याला सुरुवात..! चेन्नईनं जिंकला टॉस; मुंबईकडून दोघांचं पदार्पण!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये आज ‘एल क्लासिको’ म्हटल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (MI vs CSK) यांच्यात सामना रंगत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्यात द्वंद्व पाहायला मिळणार आहे. या सामन्यात जडेजाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईकडून रिले मेरेडिथ आणि हृतिक शोकीन पदार्पण करत आहेत.

चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात नेहमीच जोरदार टक्कर राहिली आहे. दोन्ही संघांकडे एकूण ९ आयपीएल ट्रॉफी आहेत. चेन्नई सुपर किंग्सने ४ वेळा आयपीएल आणि मुंबई इंडियन्सने ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघांना एकमेकांविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकायचे आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांची सुरुवात खराब झाली आहे. मुंबई इंडियन्सने ६ सामन्यांत सलग ६ पराभव पत्करले आहेत, तर चेन्नईने ६ पैकी फक्त एकच सामना जिंकला आहे.

दोन्ही संघांची Playing 11

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, डॅनियल सॅम्स, हृतिक शोकीन, रिले मेरेडिथ, जयदेव उनाडकट, जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपर किंग्ज – ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, शिवम दुबे, रवींद्र जडेजा (कप्तान), एमएस धोनी (यष्टीरक्षक.), ड्वेन प्रिटोरियस, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, महेश थिक्षना, मुकेश चौधरी.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!