Share

“…हा सगळा प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असाच आहे”, संजय राऊत यांचा केंद्र सरकारला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : देशातील वीजनिर्मिती प्रकल्पांतील कोळसा साठा मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागल्याने भारनियमनाचे संकट आणखी गडद झाले. दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘कोळशाच्या पुरवठ्यासाठी केंद्र सरकार आज जी धावाधाव करीत आहे ती वेळीच केली असती तर आज देशाला बसलेला वीज संकटाचा ‘झटका’ तुलनेने कमी बसला असता. विजेची तूट असलेल्या राज्यांची संख्या आठवडाभरात १० वरून १५ वर गेली नसती. वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा वाहून नेणाऱ्या मालगाड्यांची धावाधाव करावी लागली नसती आणि त्यासाठी ७०० च्या आसपास रेल्वे प्रवासी गाड्या रद्द करून हजारो प्रवाशांना आगीतून फुफाट्यात टाकण्याची वेळ आली नसती. हा सगळा प्रकार ‘वरातीमागून घोडे’ असाच आहे.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील १५ पेक्षा जास्त राज्ये सध्या वीज टंचाईच्या अंधारात बुडण्याची भीती निर्माण झाली आहे. या संकटासाठी कोळशाची टंचाई हे मुख्य कारण आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारच जबाबदार आहे. पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी इंधन करकपातीच्या मुद्दय़ावरून बिगरभाजप राज्य सरकारांना अकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मग आता कोळशाच्या टंचाईचे खापरदेखील केंद्र सरकार राज्य सरकारांवरच फोडणार आहे का? वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही केंद्राचीच जबाबदारी आहे’, असेही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!