🕒 1 min read
मुंबई: गुजरातमधील हार्दिक पटेल आणि पंजाबमधील सुनील जाखड यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकला आहे. काँग्रेसला लागलेल्या गळतीबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेसची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. ठिगळ तरी कोठे लावायचे? पंजाबमधील काँग्रेसचे नेते सुनील जाखड आणि गुजरातमधून हार्दिक पटेल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. राजस्थानमध्ये काँग्रेसचे चिंतन शिबीर पार पडले. त्या चिंतन शिबिराची मांडव परतणी सुरू असतानाच काँग्रेसला ही अशी गळती लागली. गेल्या काही काळापासून ‘गळती’ हा प्रकार काँग्रेसला नवीन राहिलेला नाही, पण सोनिया गांधींपासून राहुल गांधींपर्यंत सगळ्यांनीच काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी ‘हाक’ दिली असतानाच नव्याने गळतीला आरंभ व्हावा हे चिंताजनक आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पंजाबचे सुनील जाखड व हार्दिक पटेल बाहेर का पडले यावर चिंतन करण्याची वेळ आली आहे. बलराम जाखड हे काँग्रेस पक्षाचे एकेकाळचे दिग्गज नेते, गांधी परिवाराचे अत्यंत विश्वासू. बलराम लोकसभा अध्यक्षही झाले. सुनील जाखड हे त्याच बलरामांचे चिरंजीव. पंजाब काँग्रेसचे त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले, पण नवज्योत सिद्धूला फाजील महत्त्व मिळाल्याने जाखड बाजूला फेकले गेले. त्याच जाखड यांनी शेवटी भारतीय जनता पक्षाची वाट धरली. जाखड यांनी पक्ष सोडताना काँग्रेस नेतृत्वाला काही सवाल केले. ‘‘मी पंजाब आणि राष्ट्रहिताचेच बोलत होतो, पण त्यावर काँग्रेसने मला ‘नोटीस’ देऊन काय साध्य केले?’’ हा त्यांचा मुख्य सवाल आहे. काँग्रेसने माझा राष्ट्रवादी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप जाखड करतात. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
२०२४ ची तयारी मोदी व त्यांचा पक्ष वेगळ्या पद्धतीने करीत असताना काँग्रेसमधील ‘गळती’ हंगाम सुरूच आहे आणि त्या पक्षाची अवस्था आभाळ फाटल्याप्रमाणे झाली आहे. संसदीय लोकशाहीसाठी हे चित्र बरे नाही. जाखड, हार्दिक यांच्यानंतरही ठिगळे वाढतच जाण्याची भीती आहे. ही भोके शिवणार कशी? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “फिरलेली माथी ठिकाणावर आणण्यासाठी पुणे…”, ‘मनसे’चा इशारा
- “…वेळ आपल्या देशावर आलेली नाही याचं सर्व श्रेय बाबासाहेबांना जातं”, शरद पवारांचे मोठे वक्तव्य
- “मी मुख्यमंत्री असताना डॉ. आंबेडकरांचे…”, शरद पवारांनी सांगितली ‘तो’ प्रसंग
- “…ह्यापुढे होता कामा नाही”, पुण्यातील ‘त्या’ प्रकरणानंतर जितेंद्र आव्हाड संतापले
- IPL 2022 RCB vs GT : चाहते म्हणतायत…तेरा बाप आया! विराटच्या खेळीचं सोशल मीडियावर धडाकेबाज सेलिब्रेशन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
