मुंबई : राज्य विधीमंडळाचे अधिवेशन 5 दिवसांत मुंबईमध्येच पार पडले. या अधिवेशनामध्ये अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पाहायला मिळाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रकृती नाजूक असल्या कारणाने अधिवेशनाला हजर राहू शकले नाहीत.
मुख्यमंत्र्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिवेशनामध्ये जबादारीने कामगिरी पार पाडली. त्यावरुन विरोधकांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली. विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या कामगिरीचे गोडवे गायले आहेत.
हिवाळी अधिवेशन अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडले. या अधिवेशनाची जबाबदारी अजित पवार यांनी अत्यंत उत्तमपणे पार पाडली. दोन घेत, चार देत त्यांनी अधिवेशन हाताळले, अशा शब्दात संजय राऊत यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे. संजय राऊत आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांची प्रकृती चांगली असल्याचे देखील सांगितले आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. पण त्यांना काही पथ्य आहेत. मात्र, तरीही ते अधिवेशनावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवून होते, असं सांगतानाच विधानसभेचं कामकाज अत्यंत सुरळीत पार पडले. अजित पवार यांच्यावर जबाबदारी होती. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने टोले देत टोले घेत, दोन देत चार घेत अशा प्रकारे अधिवेशन पार पडलं, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- तुमचं पत्र बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल कडाडले
- “अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा”, रुपाली पाटलांनी केले अजित पवारांचे कौतुक
- …नाहीतर उपमुख्यमंत्री असे तोंडावर आपटले नसते; मनसेचा टोला
- ऋषभ पंतने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम
- “आठवले आंबेडकरी चळवळीला लागलेले कलंक” आनंदराज आंबेडकरांची टीका


