Share

“आठवले आंबेडकरी चळवळीला लागलेले कलंक” आनंदराज आंबेडकरांची टीका

Published On: 

पुणे: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) हे आंबेडकरी चळवळीला लागलेला कलंक आहे, अशी जहरी टीका रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी केली आहे. त्यांनी कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन केल्यानंतर हे वक्तव्य केले.

दरम्यान यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरदेखील टीका केली. सरकार ओमिक्रॉनची भीती दाखवून निवडणुका पुढे ढकलू पाहत आहे. ओमिक्रॉनचा धोका जास्त नसल्याने या वर्षीचा ‘शौर्य दिन’ हा लाखोंच्या संख्येच्या जनसमुदायाने संपन्न होणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच कोरोना हा अजिबात गंभीर विषाणू नसून त्यामुळे भीमा कोरेगावला मोठ्या संख्येने या असे आवाहनही आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी नक्षलवाद, आनंद तेलतुंबडे आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्याबाबतही विधान केले. भीमा कोरेगाव प्रकरणात नक्षलवाद्यांचा हात आहे म्हणणं हा हास्यास्पद प्रकार आहे. नक्षलवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराचा संबंध जोडणे हा प्रकार दुर्दैवी आहे. भाऊ चोर आहे म्हणून सगळेच चोर असं म्हणण्याचा हा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर आनंद तेलतुंबडे आणि मिलिंद तेलतुंबडे यांनी देशविरोधी कारवाया केल्या असतील तर शिक्षा झाली पाहिजे मात्र तसं नसेल तर उगाच कुणालाही शिक्षा होऊ नये असेही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!